धावत्‍या कारने अचानक घेतला पेट

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ डिसेंबर २०२१ । भुसावळ तालुक्यातील जाडगाव – वरणगाव रोडवर चालू इंडिका कारने अचानक पेट घेतला. ही कार रस्‍त्‍यावर अनेक दिवसांपासून बंद होती. दरम्यान, घरी नेत असताना काही अंतरापर्यंत गाडी गेल्‍यानंतर अचानक पेट घेतला तर अवघ्या काही क्षणातच गाडीमध्‍ये स्‍फोट झाला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

परंतु, इंडिका कार जळून खाक झाली आहे. त्या कारमध्ये एकटा चालक प्रवास करत असल्यामुळे कारने पेट घेतल्याचे तात्काळ लक्षात आले. रस्‍त्‍यावर चालती कार पेटल्‍याने कार जळून खाक झाली आहे.

चालक खाली उतरताच कारमध्‍ये स्‍फोट

भुसावळ तालुक्यातील वरणगाव– जळगाव रोडवर काही दिवसापासून बंद अवस्थेत असलेली कार मालक ईश्वर सपकाळे हे घरी घेऊन येत होते. काही किलोमीटर प्रवास केल्यानंतर कारने अचानक पेट घेतला. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्‍यांनी गाडी थांबवली. गाडीतुन खाली उतरल्‍याक्षणी गाडीने मोठा पेट घेतला. यामध्ये गाडी जळून खाक झाली आहे. ड्रायव्हर खाली उतरल्‍यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -