⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | कृषीपंपांच्या केबल चोरीचे सत्र थांबेना..

कृषीपंपांच्या केबल चोरीचे सत्र थांबेना..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Muktainagar news-जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । तालुक्यातील शेती-शिवारातुन कृषीपंपांच्या केबल चोरीचे सत्र सुरूच असून आज मध्यरात्री पुन्हा सुकळी परीसरातुन सुमारे २५ ते ३० शेतकऱ्यांच्या केबल चोरी केली. संतापजनक म्हणजे, चोरट्यांनी ट्युबवेलसह इतर विद्युत उपकरणांची तोडफोड केली. दरम्यान, टोळीचा छडा लावण्याचे आव्हान पोलीसांसमोर आहे.

तालुक्यातील सुकळी, दुई, टाकळी, चारठाणा तसेच खामखेडा शिवारात याच महिन्यात चोरीच्या घटना घडल्या. केबल चोरट्यांनी केबल चोरीसह इतर साहीत्यांची तोडफोड केल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. याप्रकरणी काही शेतकऱ्यांनी पोलिसांत तक्रारी दाखल केलेल्या आहेत. आज पुन्हा मध्यरात्री सुकळी परीसरात केबलचोरी झाल्याने याशिवाय चोरट्यांनी मोटार स्टाॅर्टर,ट्युबवेल वरील मेन पाईप,तसेच कटऑऊट यांची तोडफोड केली.

गावालगत नवीन माध्यमिक विद्यालय शेजारील आनंदा साहेबराव पाटील यांच्या शेतातील खोलीचे कुलुप तोडुन खोलीत शिल्लक असलेली सुमारे आठशे फुट तांबे धातु असलेली केबल व दोंन्ही ट्युबवेल वरील केबल चोरुन व तोडफोड केली असून सुमारे वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच शेजारील सुभाष वसंतराव पाटील यांच्या विहीरीवरील व ट्युबवेलची केबल कापुन नेली शिवाय इतर साहित्यांची तोडफोड करुन नुकसानही केले.अनंतराव रामभाऊ पाटील,बाळु माणिकराव पाटील,मणकर्णाबाई माणिकराव पाटील,माणिकराव सांडु पाटील,नारायण पाटील, काशिनाथ धनगर यांच्यासह अंदाजे सुमारे २५-३० शेतकरी बांधवांच्या कृषीपंपाच्या केबल चोरीसह नुकसान चोरट्यांनी केले.याप्रकरणी काही शेतकरी यांनी मुक्ताईनगर पोलिसांत तक्रारी दाखल केल्या.

दरम्यान सततच्या होणाऱ्या या घटनांमुळे शेतकरी वर्ग वैतागला असुन शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.पोलीसांनी लवकरात लवकर चोरांच्या टोळीचा छडा लावुन चोरट्यांना जेरबंद करण्यात यावे अशी अपेक्षा शेतकरी बांधवांकडुन आहे.पोलीसांकडुनही याबाबत प्रयत्न चालु आहे मात्र अद्यापर्यत पोलिसांच्या हाती काहीच लागत नसुन पुन्हा घटना घडत असल्याने या चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान पोलीसांसमोर ठाकले आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह