रिक्षा चालकाने महिलेस मारहाण करून पर्स लांबविले; गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२१ । तुम्हाला स्वस्तात टाइल्स घेऊन देताे, असे सांगून एका चालकाने महिलेस रिक्षात बसवून खडका राेडवर नेले. असता महिलेस मारहाण करून पर्स लंपास केल्याची घटना मंगळवारी रात्री ९.३० वाजता घडली. तसेच महिलेच्या हातातील तीन अंगठ्या काढून त्या चाेरण्याचा प्रयत्न केला. शेख चाँद ( वय माहित नाही ) असे रिक्षा चालकाचे नाव आहे. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून या रिक्षा चालका विरुद्ध भुसावळ येथील बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर असे की, मंगळवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास रिषा मुन्नालाल गाेयल (रा. शिवाजी नगर, भुसावळ) यांना स्टाईल घ्यायची हाेती. त्यावेळी रिक्षा चालक शेख चाँद याने महिलेस सांगितले की, मी तुम्हाला स्वस्तात टाइल्स मिळवून देताे. माझ्यासाेबत चला. त्याच्यावर विश्वास ठेवून महिला रिक्षात बसली. यानंतर खडका चौफुलीजवळ रिक्षा थांबवून महिलेस मारहाण करण्यात आली. तिच्या हातातील तीन साेन्याच्या अंगठ्या जबरदस्तीने काढून घेऊन चाेरून नेण्याचा प्रयत्न केला. महिलेजवळील पर्स, माेबाईल आणि ८०० रूपये राेख असा ऐवज रिक्षा चालकाने काढून घेतला.

महिलेस तेथेच उतरवून तेथून पसार झाला.

या प्रकरणी महिलेने बाजारपेठ पोलिस ठाणे गाठून घडलेला प्रकार कथन केला. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात शेख चाँद याच्या-विरूद्ध लुटीचा गुन्हा दाखल झाला. ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तपास पोलिस उपनिरीक्षक शांताराम महाजन, प्रशांत लाड हे करत आहे.

संशयिताचा शाेध सुरू

यादाखल प्रकरणातील संशयित शेख चाँद हा घटना घडल्यापासून पसार झाला आहे, त्याचा शाेध बाजारपेठ पोलिसांकडून घेतला जात आहे. संशयीत याच्या रिक्षाचाही शाेध पोलिस घेत आहे. रात्री धावणाऱ्या रिक्षांची कसून तपासणी करण्याच्या सूचना डीवायएसपी साेमनाथ वाघचाैरे यांनी दिल्या आहे.लवकरच संशयिताच्या मुसक्या आवळल्या जातील,असे त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज