शहरात खरी दहशत मोकाट कुत्र्यांचीच; ३० जणांना चावा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२१ । शहरातील मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे लहान मुले आणि त्यांचे पालक त्रस्त आहेत. गेल्या काही महिन्यात हजारो बालक व पालकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला. तर चार दिवसांत ३० जणांचे कुत्र्यांनी लचके तोडले. या रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहे.

शहरातील शाहूनगर,आंबेडकर मटण मार्केट, तांबापुरा, समतानगर, सिंधी कॉलनी यांसह विविध परिसरात मोकाट कुत्र्यांनी घराजवळ खेळणाऱ्या चिमुरड्यांचे लचके तोडले आहे. शहरात चार दिवसांत कुत्र्यांनी लचके तोडल्याने चिमुरड्यांसह नोकरदार पुरुषांना गंभीर दुखापत झाली आहे. ग्रामीण भागातही कुत्र्यांचा त्रास असून सर्वाधिक रुग्ण हे ५ ते १५ वयोगटाचे आहेत. महिन्यात ४५४ जणांचे लचके भटक्या कुत्र्यांनी ताेडले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -