fbpx

जीएसटी भरण्याची प्रक्रिया लॉकडाऊनने खोळंबणार

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२१ । कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व दुकाने बंद आहेत. दोन दिवसात पुन्हा कडक लॉकडाऊन जाहीर करणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. लॉकडाऊनमुळे वस्तू व सेवाकराचा मासिक भरणा आणि तिमाही विवरणपत्र भरण्यासाठी आवश्यक माहिती कर सल्लागारांना देताना व्यापाऱ्यांना अडचणी येत आहेत. कर भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही वेळ दुकाने खुली ठेवण्यास परवानगी दिल्यास शासनाला देखील कर लवकर मिळणार आहे.

जीएसटी भरण्यासाठी दर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत रोजच्या व्यवहारापोटी विक्री, खरेदीची बिले व माहिती कर सल्लागारांना द्यावी लागते. मात्र, कागदपत्रे दुकानामध्ये असतात. लॉकडाऊनमुळे दुकाने उघडण्यास परवानगी नसल्याने व्यापारी किंवा त्यांच्या कर सल्लागारांना ही माहिती पाठविताना अडचणी येतात. शहरात मिनी लॉकडाऊनच्या काळात  कर सल्लागार आणि वित्तीय संस्थेशी संबंधीत कार्यालये सुरू ठेवण्यास परवानगी आहे. मात्र खासगी दुकाने, शैक्षणिक संस्था बंद आहेत. जीएसटी, प्राप्तीकर संदर्भातील कामासाठी लागणारी कागदपत्रे व्यवसायाच्या ठिकाणी असतात. ती देताना व्यापाऱ्यांना अडचणी येत येतात.

गेल्या लॉकडाऊनमध्येही जीएसटी भरण्याबाबतच्या अडचणी आल्या होत्या. त्यामुळे अनेकांना दंड, जीएसटी क्रमांक बंद होणे याचा भूदंड सोसावा लागला होता. गेल्या वर्षाची स्थिती आज पुन्हा ओढवली आहे. आताही वेळेत जीएसटी भरणा आणि परतावा भरला नाही, तर इनपुट क्रेडिटवर परिणाम होईल. त्यामुळे संपूर्ण करचक्र बाधित होण्याची दाट शक्यता आहे. शासनाने पुन्हा पूर्ण लॉकडाऊन जाहीर करताना आर्थिक चक्र कोलमडणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

– शंतनू सोनवणे
मो.9405008282
कर सल्लागार, जळगाव

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज