गावठी कट्टा बागळणाऱ्या तरुणाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२१ । भुसावळ शहरातील हिरा हॉल परीसरात कंबरेला गावठी कट्टा लावून फिरणाऱ्या युवकाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १५ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला असून बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ शहरातील हिरा हॉल परीसरात एक तरुण कंबरेला गावठी कट्टा लावून फिरत असल्याची गुप्त माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक महेश घायतल, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तस्लीम पठाण, सहाय्यक फौजदार शरीफोद्दिन काझी, हवालदार मिलिंद कंक, सत्तार शेख, पोलीस नाईक दीपक कापडणे, योगेश माळी, प्रणय पवार आदींच्या पथकाने हिरा हॉल परीसरात धाव घेत रोहन पितांबर पाटील (वय-२३, रा.गजानन महाराज मंदिराजवळ, कंडारी, ता.भुसावळ) यास अटक केली. त्याच्या अंगझडतीत १५ हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा मिळून आला.

याप्रकरणी संशयित तरुणाविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास परीविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक महेश घायतल करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज