जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२२ । दोन वर्षापूर्वी महसूल विभागाने अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर वाळूसह जप्त करून पोलिस ग्राउंडमध्ये उभे केले होते. हे डंपर चाेरुन नेणाऱ्या आरोपीला अखेर चाळीसगाव शहर पोलिसांनी इंदोर येथून शिताफीने अटक केली आहे.
फिरोज शेख उर्फ भुरू सलीम शेख (वय ३३, रा. सेंधवा, हल्ली मु. इंदोर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. महसूल विभागाने सन २०२०मध्ये वाळूचे डंपर पकडले होते. हे डंपर पोलिस कवायत मैदानात लावले होते. ते मध्य प्रदेशातील डंपर सदर संशयित याने पळवले होते. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल होता. तेव्हापासून फिरोज शेख पसार होता. संशयित इंदूर येथे असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव पोलिसांना मिळाल्यावर पोलिस पथकाने २९ जुलैला इंदूर गाठले. २ दिवस पाळत ठेवल्यावर ३० जुलैला संशयित फिरोज शेख पोलिसांच्या हाती लागला. त्यास अटक करून चाळीसगावात आणले असून तपास भूषण पाटील करत आहेत.