fbpx

जळगाव पोलिसाची कामगिरी, संघाला मिळवून दिला प्रथम क्रमांक

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२१ । जिल्हा पोलीस दलातील कर्मचारी जयेश मोरे यांच्या कर्णधार पदाखाली जळगाव संघाने पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत संघाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी जयेश मोरे यांचे अभिनंदन केले आहे.

mi advt

जळगाव पोलिस दलातील कर्मचारी जयेश यशवंतराव मोरे हे आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू असून नुकतेच पुणे येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. संघाचे नेतृत्व जयेश मोरे यांनी केले. स्पर्धेत मोलाची कामगिरी करत संघाला विजय प्राप्त करुन देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

या यशाबद्दल जयेश मोरे यांचे जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे साहेब आणि अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी अभिनंदन केले आहे. तसेच पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि पोलिस दलातर्फे लागणारे सहकार्य अविरत आंतरराष्ट्रीय खेळाडूंना मिळेल असे प्रतिपादन केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज