बालगंधर्व नाट्यगृहाच्या रंगमंचाचे काम त्वरित थांबवावे; नाट्यकलावंतांची मागणी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२१ । जळगाव शहरातील बालगंधर्व खुले नाट्यगृहाच्या रंगमंचाचे सुरु असलेले काम तांत्रिकदृष्ट्या चुकीचे व निरुपयोगी असून हे काम त्वरित थांबविण्यात यावे, अशी मागणी जळगाव शहरातील नाट्य कलावंतांकडून करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन मंगळवार दि.३० रोजी महापालिका आयुक्तांना देण्यात आले.

निवेदनात, कुठल्याही नाट्यगृहाचा रंगमंच हा लाकडी असतो आणि त्या खालील जागा ही मोकळी व पोकळ असते. कलावंतांना तासन तास उभे राहून तालीम, नाटक सादर करावे लागते. यामुळे पायांच्या स्नायूवर जोर येत असतो. लाकडी रंगमंच मुळे हा त्रास कमी होतो व हालचाली सुलभ होतात. रंगमंचच्या खालील पोकळ जागेमुळे रंगमंचावर उच्चारलेल्या शब्दाचा ध्वनीचा घुमार वाढवून त्याचे परावर्तन चांगल्यारीतीने होते. त्यामुळे स्टेज हा लाकडी असणे व त्याखाली मोकळी जागा असणे अत्यावश्यक आहे, असे नमूद करण्यात आले आहे.

अशा आहेत मागण्या
मेकअप रुम, आरसे, खुर्च्या, लाइट, बाथरुम, दारे, खिडक्या अद्ययावत असल्या पाहीजेत. यासर्व गोष्टींची दुरुस्ती करण्यात यावी, बालगंधर्व नाट्यगृहात सुरु असलेले काम त्वरित थांबवून तांत्रिकदृष्ट्या अचूक काम सुरू करावे, बालगंधर्व नाट्यगृहाची वीज जोडणी त्वरित करावी, नाट्यगृहातील सर्व भंगार काढून ती जागा स्वच्छ करावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदन देतेवेळी, विशाल जाधव, दीपक पाटील, अरुण सानप, रमेश भोळे, गीतांजली ठाकरे, पवन खंबायत, गौरव लवंगे, विनोद ढगे, ॲड. कुणाल पवार, आरोही नेवे, प्रदीप भोई, विनय आहिरे, गौरव मोरे आदी नाट्यकलावंत उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -