अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ डिसेंबर २०२१ । शहरातील हरीविठ्ठल नगर परिसरात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हरीविठ्ठल नगरात १४ वर्षीय मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. दि.२७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता मोठी बहिण हिला काकाच्या घरी जाते असे सांगून घराबाहेर पडली. दुपारपर्यंत घरी न आल्याने तिच्या परिवारातील सदस्यांनी शोधाशोध सुरू केली. नातेवाईक व मैत्रिणींकडे शोधाशोध केली तिचा पत्ता लागला नाही. दरम्यान, अज्ञात व्यक्तीने तिला पळवून नेल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी केली आहे. याबाबत दि.२८ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल उषा सोनवणे करीत आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar