fbpx

सायकल रॅलीतून दिला शाकाहाराचा संदेश

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२१ । जागतिक शाकाहार दिनानिमित्त श्री जैन युवा फाउंडेशन व आर.सी. बाफना ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.१ रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीत २५० वर युवक-युवतींनी सहभाग नोंदवून शाकाहाराचा संदेश दिला.

पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, कस्तुरचंद बाफना, अजय ललवाणी, नयनतारा बाफना, राजेश जैन, सुशीलकुमार बाफना, नंदलाल गादिया, दिलीप गांधी, कनकमल राका, अभय कांकरिया आदी मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात सागरपार्क येथून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर स्वातंत्र्य चौक, नेहरू चौक, टॉवर चौकमार्गे चौबे स्कुल, राजकमल चौक, चित्रा चौक, कोर्ट चौक मार्गे महात्मा गांधी उद्यान येथे रॅलीचा समारोप झाला. रॅलीत आ. राजूमामा भोळे यांनीही सहभाग घेतला होता. यावेळी रॅलीत सहभागी १० सायकलपटुंचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जैन युवा फाउंडेशनचे अध्यक्ष आनंद चांदीवाल, सचिव विनय गांधी, कोषाध्यक्ष पारस कुचेरिया, सायकलिस्ट ग्रुप अध्यक्ष महेश सोनी, किशोर पाटील, हितेश कक्कड, किरण बच्छाव, रवी हिरानी आदी उपस्थित होते.

mi advt

रॅलीच्या यशस्वीतेसाठी प्रवीण पगारिया, राकेश गांधी, प्रितेश चोरडिया, प्रवीण छाजेड, सचिन राका, पियुष संघवी, अनिल चांदीवाल, सौरभ कोठारी, जयेश ललवाणी, संदीप सुराणा, राहुल बांठिया, मनीष लुणिया, दिनेश बाफना, सुशील छाजेड, प्रणव मेहता, तेजस जैन, चंद्रशेखर राका, अमोल श्रीश्रीमाळ, अमोल फुलपगार आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज