लग्नाचे आमिष.. तरुणाच्या दोन लाखांसह दागिने लंपास

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२१ । डामरूण ( ता. चाळीसगाव ) येथील तरूणाचे लग्न लावून देण्याचे सांगून दोन जणांनी २ लाख रूपये रोख व सोन्याचे दागिने घेवून पसार झाल्याची घटना उघडकीला आली आहे. आशा संतोष शिंदे, आणि  किरण भास्कर पाटील उर्फ बापू पाटील असे पसार झालेल्यांचे नाव असून, तरूणाच्या फिर्यादीवरून चाळीसगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की, चाळीसगाव तालुक्यातील डामरूण येथील २८ वर्षीय तरूण शेती करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. दरम्यान औरंगाबाद येथील आशा संतोष शिंदे आणि किरण भास्कर पाटील उर्फ बापू पाटील रा. आमडदे ता. भडगाव यांनी तरूणाचे लग्न लावून देतो असे सांगून तरूणाकडून २ लाख रूपये रोख व ४० हजार रूपयांचे दागिने २० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान घेवून पसार झाले. याप्रकरणी तरूणाच्या फिर्यादीवरून चाळीसगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज