सावद्याची ‘खंडेराव’ यात्रा गुरुवारी कोरोना नियम पाळून होणार साजरी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२१। सावदा येथे सालाबादप्रमाणे मार्गशीर्ष महिन्याच्या चंपाषष्ठी गुरुवारच्या दिवशी खंडेराव महाराज यात्रा उत्सव कोरोनाचे शासकीय नियम पाळून साजरा करण्यात येणार आहे. भक्तांनी नियमांचे पालन करून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सावदा येथील आठवडे बाजारातील जागृत देवस्थान खंडेराव महाराज मंदिर हे स्थानिक व परिससरतील भक्तगणाचे श्रद्धास्थान असून परिसरात दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या चंपाषष्ठीला यात्रा होत असते. यावर्षी मंदिर खुली करण्यात आली असली तरी कोरोनाच्या नवीन शासकीय आरोग्य विभागाच्या सूचना व नियमांचे पालन करून यात्रा गुरुवार दि.९ रोजी सायंकाळी ६ वाजता साजरी करण्यात येणार आहे.

यात्रेला ३०० वर्षाची बारागाडे ओढण्याची परंपरा असून परंपरेनुसार दरवर्षी बारागाडे ओढण्याचा मान पवार कुटुंबातील सहाव्या पिढीचा आहे. परंपरेनुसार सुपडू पवार, वसंत पवार, अशोक पवार यावर्षी राहुल(भगत) अशोक पवार यांचा आहे. मंदिरातील धार्मिक कार्यक्रम सकाळ आरती, तळी भरणे पूजा, अभिषेक असे मंदिरातील धार्मिक कार्यक्रम कोरोनाचे शासकीय नियम पाळून करण्यात येणार आहेत. अशी माहिती भगत खंडोबा देवस्थान संस्थांचे प्रमुख यांनी सांगितले. भगत, अशोक वसंत पवार व राहुल अशोक पवार हे मंदिराची धुरा सांभाळीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar