fbpx

कन्नड घाटात पुन्हा दरड कोसळली; प्रवास न करण्याचे प्रशासनाचे आवाहन

जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । चाळीसगावसह परिसरात दि. २५ रोजी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे कन्नड घाटामध्ये पुन्हा दरड कोसळली आहे. दरम्यान या घाटामधून कोणीही प्रवास करू नये, असे आवाहन महामार्ग पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.

काल रात्री चाळीसगाव परिसरासह इतर अन्य भागांमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे डोंगर भागातील तितुर व डोंगरी नदीला मोठा पूर आला आहे. दरम्यान, ३१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे कन्नड घाटामध्ये दरड कोसळून रस्ता खचला होता. त्यामुळे काही दिवसांसाठी घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. जिल्हाप्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून व पाहणी करून दुचाकी, हलक्या व छोट्या वाहनांच्या वाहतुकीसाठी हा घाट खुला केला होता. अवजड वाहनांना अजूनही हा घाट प्रवासासाठी खुला करण्यात आलेला नव्हता. घाट खुला करून १० दिवस उलटत नाही तोच पुन्हा काल पुन्हा कन्नड घाटामध्ये दरड कोसळली असून अधूनमधून दरड कोसळत आहेत. त्यामुळे पोलिसांनी या घाटामधून प्रवाशांनी प्रवास करू नये असे, आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे. दरम्यान, हा रस्ता बंद झाल्याने पुन्हा प्रवाशांचे हाल होणार आहे.

mi advt

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज