जर्सी गायीने दिला दोन वासरांना जन्म

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२१ । वाघडू ( ता. चाळीसगाव )  येथील गंभीर पाटील या शेतकऱ्याच्या जर्सी गायीने दोन वासरांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे ही दोन वासरे धडधाकट आहेत.

एकाच वेळी दोन वासरांना गायीने जन्म देणे ही लाखात एखादी घटना आहे. असे पशुधन पर्यवेक डॉ. एस. के. भेंडे यांनी सांगितले. गंभीर पाटील यांनी आपल्या जर्सी जातीच्या गाईस बायफच्या मदतीने कृत्रिम रेतन केले होते. पशुधन पर्यवेक्षक एस.के.भेंडे यांनी हे कृत्रिम रेतन केले होते. गर्भधारणा वाढीस लागल्यानंतर डॉ.भेंडे वेळोवेळी या गायीची तपासणी करीत होते. दिवस पूर्ण झाल्यानंतर या जर्सी जातीच्या गाईने दोन वासरांना नैसर्गिकरीत्या जन्म दिला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -