fbpx

जळगावमधील रेणुका नगरात पार्टीशन शेडला भीषण आग

जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ मे २०२१ । जळगाव शहरामधील रेणुका नगरात नगरात असलेल्या भीकन निंबा चौधरी यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर असणार्‍या पार्टीशनला आज मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत शेडमध्ये असणार्‍या वस्तू जळून खाक झाल्या आहेत. यामुळे येथे आपल्या दोन मुलांसह राहणार्‍या निराधार महिलेचा संसार उघड्यावर आला आहे.

याबाबत असे की, रेणुकामाता नगरात असलेल्या भीकन चौधरी यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर असणार्‍या पार्टीशनमध्ये रेखा पिंटू भालेराव ही महिला आपल्या दोन मुलांसह राहते.  या महिलेचे पती वारले असून ती एकटीच आपल्या दोन्ही मुलांसह या पार्टीशनयुक्त घरामध्ये वास्तव्यास होती. ही महिला बांधकाम कामगार असून भल्या पहाटे गाडेगाव येथे काम करण्यासाठी गेली होती. ती महिला गाडेगावला पोहचत नाही तोच तिच्या शेजारच्यांनी फोन करून तिला तिच्या घराला आग लागल्याची माहिती दिली. यानंतर ही महिला तातडीने घरी आली.

mi advt

आज सकाळी घरातून आगीचे लोळ येतांना पाहून परिसरातील लोकांनी अग्नीशामन दलाच्या पथकाला पाचारण केले. महापालिकेच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र दरम्यान, येथे राहणार्‍या महिलेच्या घरातील जीवनोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती पहिल्यांदा समजली नाही. मात्र मीटरच्या वर असणार्‍या विजेच्या तारेमुळे शॉर्ट सर्कीट होऊन आग लागल्याचे दिसून आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज