हॉटेल, सर्व खाद्यपदार्थ विक्री दुकानात खाद्य पर्यवेक्षकाची नियुक्ती आवश्यक

 

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२१ ।  केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएएआय-FSSAI) सर्व राज्यांच्या आरोग्य, सुरक्षा आणि नियमन विभागाला नवीन सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये सर्व खाद्य विक्रेत्यांना दर दोन वर्षांनी एक दिवसाचे प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे. या प्रशिक्षणात हॉटेल, ढाबा, किराणा दुकान, मिठाई, दूध, सर्व खाद्य पदार्थ व्यावसायिकांना अन्न बनवण्याची पद्धत व स्वच्छतेची माहिती दिली जाणार आहे. कै. वनजी बाबा ग्रामीण विकास मंडळ यासाठी पुढाकार घेत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे प्रशिक्षण महत्वपूर्ण असून केंद्र सरकार मान्यता प्राप्त प्रमाणपत्र दिले जात आहे.

 

अन्न सुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र (FOSTAC) हा अन्न सुरक्षा आणि प्रमाणित अधिनियम, नियम आणि नियम याविषयी जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने भारतीय खाद्य सुरक्षा आणि प्रमाणित प्राधिकरण यांचा एक व्यापक स्तरावरील प्रशिक्षण देत आहे.तर भारतामध्ये प्रशिक्षण देणायचे काम हे कै.वनजीबाबा ग्रामीण विकास मंडळ(KVGVM)संस्था यांना दिले आहे. प्रशिक्षण हे ऑनलाइन पद्धतीने दिले जात असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपर्क आणि संसर्ग टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 

कै.वनजीबाबा ग्रामीण विकास मंडळ(KVGVM) संस्थे मार्फत प्रशिक्षण घेतल्यानंतर अन्नपदार्थ विक्रेत्याला केंद्र सरकारची मान्यता असलेले प्रमाणपत्र दिले जात आहे. हॉटेल, ढाबा, किराणा दुकान, मिठाई, दूध, सर्व खाद्य पदार्थ व्यावसायिकांना हे प्रशिक्षण आवश्यक आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज