fbpx

वहीगायनसह सर्व लोककलेच्या संवर्धनासाठी शासनाने धोरण निश्चित करावे : विनोद ढगे

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२१ । खान्देशाच्या मातीतील अस्सल लोककला असलेल्या वहीगायन या लोककलेला शासनाने त्वरीत राज मान्यता द्यावी व खान्देशातील वहीगायन लोककलेसोबतच खान्देशातील इतर सर्व लोककलेच्या जतन व संवर्धनासाठी शासनाने खान्देशासाठी स्वतंत्र सांस्कृतिक धोरण निर्माण करावे, अशी मागणी खान्देश लोककलावंत विकास परिषदचे अध्यक्ष विनोद ढगे यांनी केली.

खान्देश लोककलावंत विकास परिषदेच्यावतीने रावेर येथील माळीवाडा येथे तालुकास्तरीय वहीगायन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन विनोद ढगे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाघोडचे जेष्ट वहीगायन कलावंत शाहीर रघुनाथदादा मोपारी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून रावेरचे माजी नगराध्यक्ष गोटू महाजन शिवसेनानेते प्रल्हाद महाजन, भाजपचे पदमाकर महाजन, उमेश महाजन आदी उपस्थित होते.

खान्देशातील लोककलावंत संघटीत
खान्देशातील सर्वच लोककला प्रकारातील लोककलावंताच्या न्याय व हक्कासाठी खान्देश परिषदेच्या माध्यमातून लढा उभारण्यात आला आहे. वहीगायन लोककलेच्या संवर्धनासाठी खान्देशातील लोककलावंत संघटीत झाला आहे. या मेळाव्यात खान्देश लोककलावंत विकास परिषद रावेर तालुकाअध्यक्षपदी गणेश महाजन यांची निवड करण्यात आली. मेळाव्यासाठी रावेर तालुक्यातील दोनशे वहीगायन लोककलावंत सहभागी झाले होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज