चाळीसगावात एकलव्य संघटनेचे पहिले अधिवेशन उत्साहात

 

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२१ ।  एकलव्य संघटनेचे पहिले अधिवेशन चाळीसगाव येथील राष्ट्रीय महाविद्यालयाच्या मैदानावर संपन्न झाले. या आंदोलनात प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य प्राजक्त तनपुरे तसेच एकलव्य संघटनेचे प्रदेश अध्यक्ष पवन राजे सोनवणे व प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकर वाघ यांच्यासह संघटनेचे महाराष्ट्रातील सर्व जिल्हा प्रमुख उपस्थित होते.

आदिवासी समाज बांधवांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. असे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे अधिवेशनामध्ये म्हणाले अधिवेशनात भिल्ल समाजाच्या मागण्यांचे एकूण बारा ठराव करण्यात आले. व त्या मागण्यांचे ठराव आदिवासी विकास राज्यमंत्री यांना सुपूर्त करून येणाऱ्या काळात या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन मंत्रीमहोदयांनी सर्व समाज बांधवांना आपल्या भाषणात दिले. तसेच अधिवेशन प्रसंगी पवनराजे सोनवणे, सुधाकर वाघ,यांचेही मार्गदर्शन झाले.अधिवेशन प्रसंगी पंधरा ते वीस हजार संख्येने समाज बांधव उपस्थित होते. तसेच प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा माळी, प्रदेश सल्लागार विनोद गायकवाड, तसेच या कार्यक्रमाचे आयोजक जळगाव जिल्हा कमिटीचे जिल्हा अध्यक्ष जळगाव लोकसभा संजू सोनवणे, जिल्हा अध्यक्ष रावेर लोकसभा निवृत्ती पवार, युवा जिल्हा जळगाव अध्यक्ष रवि सोनवणे, जळगाव जिल्हा अध्यक्ष अपंग सेल ऋषी सोनवणे, व महाराष्ट्रातील इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज