कोरोना योद्धांचा वाढदिवस साजरा करून एरंडोल पत्रकार संघाने व्यक्त केले ऋण

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२१ । एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे कोरोना काळात जीवाची पर्वा न करता असंख्य रुग्णांची सेवा करणारे व एरंडोल तालुक्यातील जेष्ठ पत्रकाराचे प्राण वाचवल्याने एरंडोल तालुका आरोग्याधिकारी डॉ.फिरोज शेख व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास पाटील यांचा वाढदिवस साजरा करून ऋण व्यक्त करण्यात आले. यावेळी त्यांचा सत्कार देखील करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एरंडोल तालुका पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष बी.एस.चौधरी हे होते. त्यांनी आपल्या मनोगतात एरंडोल येथील जेष्ठ पत्रकार यांचे कोरोना काळात शर्थीचे प्रयत्न करुन प्राण वाचल्यामुळे एरंडोल तालुका वैद्यकीय विभगातील सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे ऋण व्यक्त केले. यावेळी डॉ. फिरोज शेख, डॉ. कैलास पाटील व पत्रकार उमेश महाजन यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष कैलास महाजन, सचिव पंकज महाजन, कोषाध्यक्ष कुंदनसिंग ठाकुर, सहसचिव पिंटू राजपुत, समन्वयक दिनेश चव्हाण, हिशेब तपासनीस नितीन ठक्कर, प्रसिद्धी प्रमुख उमेश महाजन आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुधीर शिरसाठ यांनी तर सूत्रसंचलन कैलास महाजन यांनी केले. आभार नितीन ठक्कर यांनी मानले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज