वहनोत्सव : जळगाव शहरात आज निघणार गरुडराजचे वहन

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२१ । जळगावनगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या वाहनोत्सवाला सुरुवात झाली आहे. शनिवार दि.१३ रोजी गरुडाचे वहन निघणार आहे. सायंकाळी ७ वाजता गादीपती मंगेश महाराज यांच्या हस्ते वहन पूजन व आरती होणार होऊन या वाहनाला सुरुवात होणार आहे.

पक्ष्यांचा राजा, खगांचा इंद्र म्हणून गरुडाची ओळख आहे. खगेंद्रा वैनतेय हाच, गरुड भरारी हे याच वैशिष्ट्य आहे. कश्यप ऋषी व विनिता माता यांचा सुपुत्र व सूर्याचा सारथी असणारा अरुण याचा बंधू आहे. सर्पकुळाचा कर्दनकाळ. आपल्या मातेसाठी अमृत प्राप्तीच्या वेळी देवांनाही पराभूत करणारा बलशाली गरुड. नंतर नम्र होऊन विष्णूंचं वाहन होण्याच भाग्य प्राप्त झालेला गरुड. देहातून प्राण गेल्यानंतरचा प्रवास कसा याचा वर्णन येते ते गरुड पुराणातच. अशा गरुडावर आरुढ होऊन श्रीरामचंद्र येणार आहे.

असा आहे वहनाचा मार्ग
सायंकाळी ७ वाजता श्रीराम मंदिर संस्थान येथे गादीपती मंगेश महाराज यांच्या हस्ते वहन पूजन व आरती होईल. त्यानंतर वहन श्रीराम मंदिरातून निघून भोईटे गढी, कोल्हे वाडा, आंबेडकर नगर, विठ्ठल पेठ, तेली चौक मार्गे येत रामपेठेतील पाटीलवाडा येथील राजेंद्र भैय्यासाहेब पाटील यांच्याकडे वहन आरती व पानसुपारीचा कार्यक्रम होईल. तेथून राम मंदिर, रथ चौक, बालाजी पेठ मार्गे शनिपेठेतील शनिमंदिरा मागे नगरसेवक मुकुंद सोनवणे यांच्याकडे देखील आरती व पानसुपारीचा कार्यक्रम होईल. यानंतर बालाजी पेठ, रथ चौक मार्गे वहन श्रीराम मंदिरात येईल, याठिकाणी राम भक्तांना मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते श्रीफळ देण्यात येईल.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज