‘त्या’ अपघातातील आणखी एका तरुणाचा मृत्यू; मुंबईत सुरू हाेते उपचार

जळगाव लाईव्ह न्यूज | १५ नोव्हेंबर २०२१ | सुनसगाव रस्त्यावरील उड्डाण पुलाखाली डंपर आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातातील आणखी एका तरुणाचा रविवारी रात्री मृत्यू झाला. दि.१२ नाेव्हेंबर रोजी मित्राचा वाढदिवस साजरा करून तिघेही मित्र घरी परतत होते, यावेळी भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली होती. यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झालेला होता.

नशिराबाद येथील सिद्धार्थनगरातील विशाल उर्फ विकी रमेश रंधे (वय-२५), रोहित दगडू इंगळे (वय-२५) व उदय भगवान बोदळे (वय-२३) हे तिघे मित्र गुरुवारी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास मित्राचा वाढदिवस साजरा करून घरी परतत हाेते. यावेळी नशिराबादच्या सुनसगाव रस्त्यावरील उड्डाण पुलाखालील बोगद्याजवळ जळगावकडून सुनसगावकडे जाणाऱ्या वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपर (क्र. एम.एच.१९, झेड. ४७४८) ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात विशाल रंधे या तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. तर रोहित इंगळे व उदय बोदडे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मुंबईत सुरु होते उपचार
अपघातात रोहित इंगळे याच्या डोक्याला जबर मार लागला होता. त्याच्यावर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला मुंबईत नेण्यात आले हाेते. तेथे त्याच्यावर उपचार सुरु असतांना रविवार रात्री त्याचा मृत्यू झाला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज