fbpx

कोरोनाने मृत्यू झालेल्या पित्याला मुलीने दिला अग्निडाग!

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२१ । जळगाव शहरातील शनीपेठ परिसरात असलेल्या रिधुर वाड्यात राहणारे दिनकर रामदास सोनवणे यांचे बुधवारी कोरोनाने निधन झाले.

आपल्या पित्याला अग्निडाग देण्यासाठी मुलगी राणी पुढे सरसावली. रात्री १० वाजता मुलीच्या हस्ते पित्याला अग्निडाग देण्यात आला. कोरोनामुळे खबरदारी घेत मृतदेह पीपीई किटमध्ये गुंडाळलेला होता आणि मुलीने देखील पीपीई किट परिधान करून अंत्यसंस्कार विधी पूर्ण केले. नगरसेवक मुकुंदा सोनवणे यांनी कुटुंबाचे सांत्वन करून त्यांना सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यास सहकार्य केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज