वाढदिवस साजरा करणाऱ्या दाम्पत्याची रोडरोमिओंनी काढली छेड, नातेवाईकांनी दिला चोप

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२१ । शहरातील कोल्हे हिल्स परिसरात पत्नीचा वाढदिवस असल्याने आनंद साजरा करीत बसलेल्या दाम्पत्याची २ रोडरोमिओंनी छेड काढल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी घडला. तरुणीने याबाबत नातेवाईकांना माहिती देताच त्यांनी तरुणाला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.

जळगाव शहरात मुळात फिरायला काही मनोरंजनाची ठिकाणे नाही. मेहरूण तलाव, कोल्हे हिल्स परिसर, भाऊंचे उद्यान, गांधी उद्यान सोडले तर इतर काहीही नाही. आरएमएस कॉलनी परिसरात राहणारे एक दाम्पत्य पत्नीचा वाढदिवस असल्याने सहज फेरफटका मारायला सायंकाळी ४ च्या सुमारास गेले होते.

कोल्हे हिल्स परिसरात दाम्पत्य बसलेले असताना दोन टवाळखोर तरुणांनी त्यांच्याकडे पाहून शिट्ट्या वाजवल्या आणि शेरोशायरी केली. वाद नको म्हणून दाम्पत्य तिथून निघाले आणि खाली आले. टवाळखोर अधिकच शिरजोर होत त्यांनी दाम्पत्याच्या दिशेने दगड मारून फेकला. दाम्पत्याने जाब विचारला असता एका टवाळखोराने पुरुषाच्या कानाला चावी मारली. दोघांमध्ये वाद सुरू असताना तरुणीने लागलीच नातेवाईकांना कळविले.

काही वेळात नातेवाईक आणि समाजसेविका रेखा पाटील या त्याठिकाणी पोहचल्या. टवाळखोर तरुणांना जाब विचारत ते अरेरावी करीत असल्याने नातेवाईकांनी त्यांना चांगलाच चोप दिला. तसेच तालुका पोलिसांना याबाबत माहिती देत दोघांना तालुका पोलिसांच्या स्वाधीन केले. गजानन गोपाळ, बंटी पाटील अशी दोघांची नावे असल्याचे समजते. शहरात टवाळखोर दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांनी विशेषतः निर्भया पथकाने लक्ष वेढण्याची गरज आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज