fbpx

समाधी मंदिरावरील तांब्याची छत्री लंपास

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२१ । कुसूंबा शिवारातील एका शेतातील बोबडे बुवा महाराज यांच्या समाधीवर लावण्यात आलेली साडे सहा किलो वजनाची तांब्याची छत्री अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या कुसूंबा शिवारात यशवंत पाटील यांचे शेत असून या शेतात बोबडे बुवा महाराज यांचे समाधी मंदिर आहे. दरम्यान, कोणीतरी अज्ञात चोरट्याने बोबडे बुवा महाराज यांच्या दगडी शिलावर लावण्यात आलेली साडे सहा किलो वजनाची व ३० हजार रुपये किमतीची तांब्याची छत्री बुधवार दि.२२ च्या सायंकाळी ५ ते गुरुवार दि. २३ रोजीच्या सकाळी ८ वाजेच्या दरम्यान चोरून नेली. याप्रकरणी वसंत नवल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज