थंडीचा कडाका वाढणार.. नागरिकांसाठी तज्ज्ञांनी दिला विशेष सल्ला

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । साईसिंग पाडवी । जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसानंतर अचानक थंडीची लाट आली होती. दोन दिवस थंडी वाढल्यानंतर पुन्हा कमी झाली. गेल्या दोन दिवसापासून थंडीचा जोर वाढला असून पुढील आठवड्यात थंडीचा कडाका वाढणार आहे. काहींना थंडी हवीहवीशी वाटत असली तरी थंडीमुळे दम्याच्या रुग्णांना त्याची झळ बसणार आहे. दम्याच्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

वेलनेस फाउंडेशनचे प्रमुख डॉ.निलेश गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवाद वादळ गेल्यानंतर आता पुन्हा थंडीचा जोर सलग ६ दिवस हळूहळू वाढणार आहे. त्यानंतर पुढच्या आठवड्यात म्हणजेच, दि.१६ तारखेपासून थंडीची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे. साधारणतः तापमान १४ ते १६ अंश ( डिग्री ) सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. थंडी वाढणार असल्याने उबदार कपडे आणि शेकोटीचा आधार घ्यावा लागणार आहे.

प्रसिद्ध छातीरोग तज्ज्ञ डॉ.कल्पेश गांधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, थंडी वाढल्याने जे दम्याचे रुग्ण आहेत त्यांचा त्रास वाढला आहे. दमा रुग्णांना सर्दी,  खोकला,ताप आणि श्वास घेण्यास त्रास होण्याची समस्या जाणवत आहे. मधल्या काळात काही रुग्णांनी औषधे घेण्याचे बंद केले केल्याने त्यांचाही त्रास वाढला आहे. वेळेनुसार औषध चालू केल्यानंतर पुन्हा रुग्ण पूर्ववत होत असले तरी वातावरणात बदल होत असल्यामुळे दम्याचे रुग्ण पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. दमा आणि श्वसनासंदर्भात आजार असलेल्या रुग्णांनी औषधांची यादी नियमितपणे सोबत ठेवावी, तपासणीकरिता जाताना देखील एक व्यक्ती सोबत असू द्यावा आणि घरच्या घरी व्यायाम करण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला त्यांनी दिला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -