शहरातील खड्ड्यांचा दावा जनहिताचा, जळगाव न्यायालयात होणार कामकाज

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२२ । शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत दाखल दाव्यात महापालिकेला आणखी एक धक्का सहन करावा लागताे आहे. रस्त्यांचा विषय जनहिताचा असल्याने दिवाणी न्यायालयात दावा दाखल करता येऊ शकताे यावर शिक्कामाेर्तब करत औरंगाबाद खंडपीठाने महापालिकेची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे जळगाव न्यायालयात दाखल दाव्यात कामकाज हाेणार आहे.

शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या कामांसाठी ऍड. प्रदीप कुलकर्णी यांनी जळगाव दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. या संदर्भात ऍड. कुलकर्णी यांनी पाठवलेली नाेटीस व दाव्यात न्यायालयाने बजावलेल्या समन्सप्रकरणी जळगाव महापालिकेकडून खुलासा करण्यात आला नव्हता. त्यानंतर महापालिकेच्या वतीने खड्ड्यांचा विषय हा जनहिताचा असल्याने केवळ उच्च न्यायालयातच दावा दाखल करता येताे अशी भूमिका घेत दावा फेटाळण्याची मागणी केली हाेती; परंतु जिल्हा दिवाणी न्यायालयाने ही मागणी फेटाळली. या निर्णयाविराेधात महापालिकेने उच्च न्यायालयात अपिल दाखल करण्यासाठी मुदत मागितली हाेती. न्यायालयानेही पंधरा दिवसांचा कालावधी दिला हाेता. त्यात गेल्या महिन्यात अपील दाखल झाले. त्यात ११ जानेवारी राेजी न्यायाधीश मंगेश पाटील यांच्या न्यायासनासमाेर कामकाज चालले.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -