fbpx

आईला वाचविताना विहिरीत बुडून मुलाचाही मृत्यू

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२१ । पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली येथे शेतात फवारणी करीत असलेली महिला विहिरीजवळ पाणी घेण्यासाठी गेली असता तोल जावून विहिरीत पडली. बुडत असलेल्या आईला वाचविण्याच्या प्रयत्नात मुलाचाही बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना आज सकाळी घडली.

अंतुर्ली येथील शेत शिवारात प्रतिभा पंढरीनाथ पाटील (वय-४५) यांचे शेत आहे. आज सकाळी दि.९ सप्टेंबर रोजी त्यांच्या शेतात फवारणी करण्यासाठी मुलगा नितीन पाटील याच्यासह गेल्या.

शेतात काम करताना फवारणीसाठी लागणारे पाणी घेण्यासाठी प्रतिभा पाटील ह्या दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातील विहिरीजवळ गेल्या. विहिरीतून पाणी काढत असतांना त्याचा तोल गेल्याने त्या विहिरीत पडल्या. आई विहिरीत पडल्याचे पाहून मुलगा नितीन पाटील याने विहिरीकडे धाव घेतली. आईला वाचविण्यासाठी त्याने देखील विहिरीत उडी घेतली. दरम्यान विहिरीत गाळ असल्यामुळे आई व मुलगा यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच परिसरात शेतातील शेतकरी व नागरीकांनी धाव घेतली. तब्बल दोन तासानंतर दोघांचा मृतदेह विहिरीतून काढण्यात आला. पाचोरा ग्रामीण रूग्णालयात देाघांचे मृतदेह आणण्यात आले आहे.

तीन वर्षापूर्वी भावाचा देखील मृत्यू
तीन वर्षांपुर्वी नितीन पाटील यांचा भावाचे देखील विहिरीत पडून मृत्यू झाला होता अशी माहिती येथील नागरीकांनी बोलतांना दिली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज