fbpx

कारची दुचाकीला धडक ; एक ठार, एक जखमी

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२१ । दुचाकीला कारने मागून धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात अमळनेर तालुक्यातील धार येथील ४७ वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना  धुळे रस्त्यावर जानवे ते डांगरदरम्यान मंगळवारी दुपारी घडली. किशोर शालीग्राम मिस्तरी (वय ४७)  असे मृताचे नाव आहे. तर अपघात एक जखमी झाला आहे.

याबाबत असे की, किशोर मिस्तरी व विकास रमेश पाटील (वय २८, दोघे रा. धार, ता अमळनेर) हे दुचाकीने (क्रमांक-एम.एच.१९-बी.डब्ल्यू.३८०४) अमळनेरकडून धुळ्याकडे जात होते. जानवे ते डांगर गावादरम्यान मागून येणाऱ्या चारचाकीने (क्रमांक-एम.एच.१९-सी.यु.४२४२) दुचाकीला धडक दिली.

mi advt

या अपघातात किशोर मिस्तरी यांचा जागीच मृत्यू झाला, तर विकास पाटील गंभीर जखमी झाला. अपघातानंतर रस्त्याने जाणारे चेतन सुतार, शशिकांत बोरसे, अलीम मुजावर यांनी लागलीच १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला बोलावले. तसेच जखमींना अमळनेरात डॉ.अनिल शिंदे यांच्या दवाखान्यात दाखल केले. याप्रकरणी चेतन सुतार यांच्या फिर्यादीवरून चारचाकीचालक रजनीकुमार कांतीभाई पटेल (रा.जळगाव) याच्याविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल झाला. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज