बांभोरी नजीक चालत्या कारने घेतला पेट, गाडी जळून खाक

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑक्टोबर २०२१ । महामार्ग क्रमांक सहावरील एसएसबीटी बांभोरी इंजिनिअरिंग कॉलेज पुढे सावली होस्टेल जवळ एका चालत्या रेनॉल्ट डस्टर कारने अचानक पेट घेतल्यानंतर गाडी जळून खाक झाली. दरम्यान, या वाहनातून कोण, कुठे जात होते? कोणाच्या मालकीचे वाहन आहे?, याची माहिती मात्र लगेच समजू शकली नाही.

याबाबत असे की, बांभोरी इंजिनिअरिंग कॉलेज पुढे सावली होस्टेल जवळ एम एच ०२ – डी एन – ००७९ या क्रमांकाच्या रेनॉल्ट डस्टर कारने  अचानक पेट घेतला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे वाहन चालक देविदास सुरवाडे हे फायरमन रोहिदास चौधरी, हिरामण बावस्कर, पन्नालाल सोनवणे आदींनी घटनास्थळ गाठून आग विझविली. तोपर्यंत गाडी जळून खाक झाली होती. दरम्यान, यावेळी बघ्यांची संख्या मोठ्या प्रमाणत होती. यावेळी काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती

दरम्यायान, हे वाहन कुणाच आहे, वाहनातून कोण, कुठे जात होते? कोणाच्या मालकीचे वाहन आहे ?, याची माहिती मात्र लगेच समजू शकली नाही.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज