muktainar news-जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । शाळा भरण्याच्या दोन तास आधीच विद्यार्थांना शाळेत सोडणारी मुक्ताईनगर ते मेळसांगवे बस वेळेवर सोडावी, अश्या मागणीचे पत्र उचंदे येथील महाविद्यालय व मेळसांगवे ग्रामपंचायतीसह मनसेने मुक्ताईनगर आगार व्यवस्थापकांना दिले आहे.
सदर बसफेरी ९:४५ मिनिटांनी मेळसांगवे गावात पोहचावी मेळसंगावे, मुढोळदे, शेमळदे,येथील शाळेची मुले मुली घाटे विद्यालय उचंदे येथे बस ती १०:३० वा.पर्यंत पोहचेल योग्य वेळी पोहोचतील जास्त वेळ मुलांना बस स्थानक वा कुठे शाळेच्या आवारात फिरणार नाही आणि अनुग्रह घडणार नाही यासाठी मनसे च्यां वतीने निवेदन देण्यात आले.
त्या बाबत साठे डेपो मॅनेजर मुक्ताईनगर यांनी ती अर्धातास वेळ वाढवून योग्य वेळापत्रकात तरतूद केली, यासाठी मेळसांगवे ग्रामपंचायत चे सरपंच सुवर्णा नागऋत घाटे विद्यालय चे प्राचार्य एम.बी.महाजन,पर्यवेक्षक ए.एस.पाटील,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न करून मेळसांगवे माजी सरपंच विकास सोसायटीचे चेअरमन भास्कर पाटील व मनसे तालुका अध्यक्ष मधुकर भोई यांनी पाठ पुरावा केला व मार्गी विषय लावला उपस्थित मनसे पदाधिकारी हरताळ गण अध्यक्ष सुनील कोळी,मंगेश कोळी,निवृत्ती कोळी, सोपान पाटील आदी निवेदन वेळी उपस्थित होते.