⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | यावल एसटी आगारातील बसला दुचाकी चालकाने अडवले अन्..

यावल एसटी आगारातील बसला दुचाकी चालकाने अडवले अन्..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोम्बर २०२२ । यावल – चोपडा रस्त्यावर चुंचाळे फाट्या जवळ यावल एसटी आगारातील एसटी बसला एका दुचाकी चालकाने अडवले व चालकास तू बस अंगावर आणली असा आरोप करीत मारहाण केली तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी यावल पोलिसात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल एसटी आगारातील चालक प्रवीण प्रभाकर सोनवणे वय ३७ हे बस घेऊन अंकलेश्वर -बऱ्हाणपूर राज्य मार्गावरून चुंचाळे फाट्या जवळून येत होते. दरम्यान तेथेच त्यांची बस दुचाकी क्रमांक एम.एच. १९ बी. व्ही. ०१२९ वरील अज्ञात चालकाने अडवली व बस चालवतांना तू अंगावर बस आणली असा आरोप करीत प्रवीण सोनवणे यांची कॉलर पकडून त्यांना एसटी बसच्या बाहेर ओढले व चापटा बुक्कांनी छातीवर, पोटावर त्यांना मारहाण केली तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

या प्रकारणी अज्ञात दुचाकी धारक व्यक्तीविरुद्ध यावल पोलिसात शासकीय कामात अडथळा निर्माण करणे सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे करीत आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह