लग्नात आलेला वऱ्हाडीच निघाला चोर, पावणेदोन लाखांचे दागिने हस्तगत

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२१ । भुसावळात लग्नात वऱ्हाडी बनून येत दागिने लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्यास बाजारपेठ पोलिसांनी शिताफीने अटक केली. संशयिताच्या ताब्यातून १ लाख ७० हजार रूपयांचे दागिने जप्त केले आहेत. राहुल वासुदेव भामरे (वय ३७, रा.साईनगर, जळगाव) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

भुसावळ येथील बालाजी लॉनमध्ये दि.२८ नोव्हेंबरला झालेल्या विवाह समारंभात विनायक शिवाजी दराडे (वय ३०, रा. साईकिरण अपार्टमेंट, वायलेनगर, खडकपाडा, कल्याण) यांच्या पत्नीची पर्स खोली क्रमांक पाचमधून लांबवण्यात आली होती. या पर्समध्ये १ लाख १० हजार ७५४ रुपयांचे ३२ ग्रॅम सोन्याचे दागिने व सात हजारांची रोकड होती. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल हाेता. पोलिसांनी बालाजी लॉन परीसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली, तसेच रेकॉर्डवरील संशयितांची चाचपणी केल्यानंतर गोपनीय माहितीवरून राहुल भामरे याला ८ डिसेंबरला ताब्यात घेऊन चाैकशी केली.संशयीत भामरे विरोधात दर्यापूर (जि.अमरावती) न्यायालयाने घरफोडीच्या गुन्ह्यात वॉरंट काढले असून तो त्यात पसार आहे. तसेच भुसावळ शहर पोलिसात दाखल घरफोडीच्या गुन्ह्यातही ताे पाहिजे आहे.

संशयीत राहुल भामरे याला गोपनीय माहितीवरून दि.८ डिसेंबरला ताब्यात घेऊन चाैकशी करण्यात आली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. संशयित राहुल भामरे याने चोरलेले दागिने जळगावच्या रतनलाल सी. बाफना ज्वेलर्समध्ये विकल्याची कबुली दिली. पाेलिस पथकाने बाफना ज्वेलर्समधून एक लाख १४ हजार ४४६ रुपयांचे दागिने जप्त केले. दरम्यान, भामरे याच्याकडे कोणतेही बील नव्हते, त्यामुळे त्यांनी सोने खरेदीस नकार दिला मात्र त्याने दवाखान्याची अडचण सांगितल्याने त्यांनी सोने खरेदी केले व त्यास रितसर रकमेचा धनादेश दिल्याचे बाफना ज्वेलर्सतर्फे सांगण्यात आले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -