कुऱ्हा येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला विहिरीत

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ नोव्हेंबर २०२१ । कुऱ्हा काकोडा ( ता. मुक्ताईनगर ) गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत २६ रोजी तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली.

येथील नितीन भारत दाते हा ३५ वर्षाचा तरुण बुधवारी सायंकाळ पासून बेपत्ता होता. शुक्रवारी गावातील चंद्रकांत दामू इंगळे हे प्रातःविधी साठी गेले असता त्यांनी नदीकाठी असलेल्या पाणीपुरवठा विहिरीत डोकावून पाहिले व त्यांना पाण्यावर काहीतरी तरंगताना दिसले. त्यांनी लगेच शिवसेनेचे उपविभाग प्रमुख दिलीप भोलाणकर यांना बोलावले.

भोलाणकर यांनी बेपत्ता नितीन याच्या वडिलांना सोबत घेऊन विहीर गाठली. पाण्यावर तरंगत असलेला मृतदेह आपल्या मुलाचाच असल्याचे भारत दाते यांनी ओळखले आणि हंबरडा फोडला. घटनेची खबर मिळताच कुन्हा पोलीस चौकीचे नाईक हरीश गवळी, पोलीस शिपाई प्रदीप इंगळे, राहुल नावकर, संजय लाटे, सागर सावे हे घटनास्थळी दाखल झाले. गावातील ज्ञानेश्वर तायडे, विनोद ढेगे, दिलीप भोलाणकर यांनी सदर मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियदर्शी तायडे यांनी घटनास्थळीच शवविच्छेदन केले. मयत नितीन दाते यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. मजुरी करून तो कुटुंबाचे पालनपोषण करत होता.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -