‘त्या’ बेपत्ता तरुणाचा मृतदेह तलावात आढळला

जळगाव लाईव्ह न्यूज । २० नोव्हेंबर २०२१ । कामावर जातो असे सांगून घराबाहेर पडल्यानंतर बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह शुक्रवारी जळगाव शहरातील मेहरूण तलावात तरंगताना आढळला. महेंद्र हिंमत पाटील (वय ३३, रा. गजाननबाबा मंदिराजवळ, सुप्रीम कॉलनी) असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूबाबात पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.

महेंद्र पाटील हा १७ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता घराबाहेर पडला होता. कामावर जातो, असे त्याने आई सुनंदाबाई पाटील यांना सांगितले होते. सायंकाळ झाली तरी तो घरी परतला नाही. त्यामुळे नातेवाइकांनी त्याचा शेजारी, शहरात व नातेवाइकांकडे शोध घेतला. त्यानंतरही तो आढळून आला नाही. दरम्यान, महेंद्र कोठेतरी निघून गेला आहे, असा अर्ज त्याची आई सुनंदाबाई यांनी १८ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिला. त्यावरून हरवल्याबाबत नोंद करण्यात आली. गुन्ह्याचा पुढील तपास संजय धनगर करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज