किनगाव येथील बेपत्ता तरुणाचा मुतदेह आढळला विहरीत

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ डिसेंबर २०२१ । यावल तालुक्यातील किनगाव येथील ३२ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना ६ डिसेंबर रोजी उघडकीस आली होती. दरम्यान, या तरुणाचा मृतदेह गावाजवळील एका विहरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

किनगाव (ता. यावल) येथील रहिवाशी तुषार गोपाळ राणे (वय-३२) आणि त्यांच्या पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कौंटुबिक वाद सुरू होता. त्यामुळे तुषार राणे हे मानसिक तणावात होते. रविवार दि.५ रोजी तुषार राणे हे जेवण करून झोपले होते. दरम्यान, मध्यरात्री त्यांनी कुणाला काहीही न सांगता घरातून निघून गेले होते. सोमवार दि. ६ रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला होता. परिसरात शोध घेऊनही तुषार राणे हे मिळून न आल्याने त्यांच्या आई आशा राणे यांनी यावल पोलीसात धाव घेतली होती. आशा राणे यांच्या खबरीवरून बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती.

दरम्यान, या तरूणाचा गावालगतच्या शेतविहीरीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेह यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला असून याप्रकरणी यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -