रुग्णाला पाहण्यासाठी आलेल्यांची दुचाकी लांबविली

जळगाव लाईव्ह न्यूज | सुभाष धाडे | रुग्णालयात दाखल असलेलया नातेवाईकाला पाहण्यासाठी आलेल्या इसमाची दुचाकी लंपास करण्यात आल्याची घटना मुक्ताईनगर येथे घडली आहे. दरम्यान, दुचाकी लंपास करणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथील शेतमजुरी करणारे संजय रामदास कवरे हे दि.१९ रोजी मुक्ताईनगर येथे दवाखान्यात नातेवाईकांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते. घाईगडबडीत ते दुचाकीला लावलेली चाबी काढायला विसरले. या संधीचा फायदा घेत या ठिकाणी आधीच दबा धरुन बसलेल्या एका चोरट्याने दवाखान्यासमोर लावलेली होंडा शाईन दुचाकी (एम.एच.१९.सी.ई.२३८०) सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास लंपास केली.

चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
दरम्यान, हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून एक अनोळखी युवक गाडी घेवुन पसार झाल्याचे यात दिसून येत आहे. तसेच एका चारचाकी वाहना चालकाकडून या दुचाकी चोरत्याला सहकार्य मिळाले असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चद्रशेखर नाईक करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज