३९३ शिक्षकांचे टीईटी‎ प्रमाणपत्र पडताळणीसाठी केले रवाना‎

बातमी शेअर करा

जळगाव‎ लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२२ । सन २०१३ नंतर शिक्षकांसाठी‎ घेण्यात आलेल्या टीईटी पात्रता‎ परीक्षेत घोळ झाल्याच्या‎ पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील‎ सेवेत असलेल्या प्राथमिक व‎ माध्यमिकच्या ३९३ शिक्षकांचे‎ प्रमाणपत्र शिक्षण विभागाने‎ पडताळणीसाठी पुणे परीक्षा‎ परिषदेकडे पाठवले आहे.

आता या‎ शिक्षकांच्या भवितव्याचा निर्णय पुणे‎ परीक्षा परिषदेच्या पडताळणीवर‎ अवलंबून आहे.‎ शिक्षकांची नियुक्ती करताना टीईटी‎ उत्तीर्णचे प्रमाणपत्र अनिवार्य‎ करण्यात आले आहे. मात्र,‎ मध्यंतरीच्या काळात टीईटीची‎ ‎ बोगस उत्तीर्णतेची प्रमाणपत्रे वितरीत‎ करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.‎ त्यामुळे टीईटी परीक्षांचा फेरआढावा‎ घेण्याचे शासनाने ठरवले आहे.‎ २०१३ नंतर टीईटी उत्तीर्ण झालेल्या‎ प्राथमिकच्या २३७ व माध्यमिकच्या‎ १५६ असे ३९३ शिक्षकांचे प्रमाणपत्र‎ हे त्याच काळातील आहे.

त्यानुसार‎ प्राथमिक व माध्यमिक‎ शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र‎ मागवले होते. शिक्षणाधिकारी‎ कार्यालयात जमा झालेली प्रमाणपत्र‎ शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे‎ पाठवली आहे. शिक्षण‎ मंत्रालयाकडे पाठवण्यात आलेल्या‎ प्रस्तावांमध्ये शिक्षकाचे नाव,‎ शाळेचे नाव व पत्ता, टीईटी परीक्षेचा‎ बैठक क्रमांक याचा उल्लेख आहे.‎

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar