शेवटचा अल्टिमेटम देवूनही आंदोलनावर ठाम, जळगावात २० कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२१ । एसटीचे कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर ठाम आहेत. भरघोस पगारवाढ करूनही एसटी कर्मचारी अद्यापही आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना शेवटचा अल्टिमेटन देवूनही माघार न घेतलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या २० कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्याचे आदेश आगार प्रमुख भगवान जगनोर यांनी काढले आहे. मात्र, असं असलं तरी सेवा समाप्ती केलेल्या कर्मचाऱ्यांनी शेवटच्या अल्टिमेटमच अनोख आंदोलन करत स्वागत केले आहे.

एसटी विलीनीकरणाच्या मागणीवरून मागील गेल्या महिन्याभरापासून कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. पगारवाढ करूनही एसटीचे कर्मचारी संपावर ठाम आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्माचाऱ्यांना अखेरची एक संधी म्हणून सोमवार म्हणजेच आजपर्यंत कामावर हजर राहण्याचा शेवटचा अल्टिमेट दिला होता.

मात्र, शेवटचा अल्टिमेटन देवूनही माघार न घेतलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या जळगावातील २० कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्याचे आदेश काढण्यात आले. यात १२ चालक, ७ वाहक आणि १ सहाय्यक कर्मचारी यांचा समावेश आहे.

यावेळी एसटी कर्मचारी यांनी सांगितले की, मेस्माची कारवाई असो की निलंबनाची कारवाई आम्ही कारवाईला घाबरत नाही. शासनाने कारवाई करत राहावे, आम्ही या कारवाईचा फुलांप्रमाणे स्वीकार करू असे, म्हणत जळगाव आगारातील कर्मचाऱ्यांनी स्वत च्या हाताने स्वत: च्या अंगावर फुलांचा वर्षाव करत अनोखा पध्दतीने कारवाईचा निषेध व्यक्त केलाय. मात्र आंदोलनावर आम्ही शेवटपर्यंत ठाम असल्याचंही प्रशासनाला दाखवून दिले.

सेवा समाप्तीमध्ये या २० कर्मचाऱ्यांचा समावेश

आधार गोमा नन्नवरे, रजनिकांत लोटू साळुंखे, गोकुळे धुडकू नन्नवरे, शंकर सुकदेव सोनवणे, लक्ष्मण तुळशीराम कोळी, लक्ष्मण रामदास नन्नवरे, मोतीलाल पांडूरंग नन्नवरे, झेंडू रामा सोनवणे, राजेंद्र दामोदरे सपकाळे, रवीकिरण पिंताबर सुर्यवंशी, युवराज राजाराम पाटील, शरद तुळशीराम सोनवणे, सुधाकर गंगाराम सोनवणे, ज्ञानेश्वर यशवंत सोनवणे, ज्ञानेश्वर भगवान सोनवणे , सुनिल तानकू पाटील, गोविंद सुकलाल ठाकरे, अशोक आत्माराम सोनवणे, प्रकाश रामचंद्र सोनवणे, वसंत बुधा पाटील या वीस कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -