fbpx

शेतीसाठी पुर्वीप्रमाणे दहा तास वीजपुरवठा करावा; भाजपा किसान मोर्चाची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२१ । शेतीसाठी ७ आँगस्टपासुन फक्त आठ तास वीज पुरवठा करण्याचा निर्णय विज वितरण कंपनीने घेतला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असून शेतीसाठी पूर्वीप्रमाणे दहा तास वीजपुरवठा करावा, अशी मागणी भाजपा किसान मोर्चातर्फे विज वितरणचे कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

विज वितरण कंपनीने ७ आँगस्टपासुन शेतीसाठी फक्त आठ तास वीज पुरवठा होईल असा निर्णय घेतला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा नसून अगोदरच वीजेसाठी शेतकऱ्यांना वेळी-अवेळी शेतात फिरावे लागते. वीज वितरण कंपनीने घेतलेला निर्णय हा अन्यायकारक आहे. शेतकऱ्यांना आठ तास ऐवजी पुन्हा दहा तास वीजपुरवठा मिळावा. तसेच शेतीतील नादुरुस्त झालेले अथवा जळालेले रोहित्र बदलून मिळण्यासाठी शेतकऱ्यांना अगोदर वीजबील भरण्याची सक्ती करण्यात येते. शेतकऱ्यांना वीजबीलांचा भरणा करण्याची सक्ती न करता लवकरात लवकर रोहित्र बदलून मिळावे, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

यांची होती उपस्थिती
निवेदन देतेवेळी भाजपा किसान मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख सुरेश धनके, तालुकाध्यक्ष राहुल महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदमाकर महाजन, तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, सरचिटणीस सी.एस.पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, शिवाजी पाटील, सारिका चव्हाण, सरपंच प्रमोद चौधरी, भाऊलाल चौधरी, हिलाल सोनवणे, संदीप महाजन, विजय पाटील, निलेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज