पावसाची अवकृपा : जिल्ह्यात उन्हाचा चटका लागला वाढू, शेतकरी चिंतेत

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२१ । पाऊस गायब झाल्याने जळगाव जिल्ह्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागला आहे. ढगाळ वातावरणातही तापमान पुन्हा पस्तीशीकडे वाटचाल करीत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरिपाच्या पिकांना सध्या पावसाची नितांत गरज असून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

दरम्यान, आज सोमवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात हाेत आहे. शनिवार आणि रविवारी अमावस्येला पाऊस येईल, अशी अपेक्षा हाेती; परंतु गेल्या रविवारी तापमान वाढले. दिवसभर उन्हाचा चटकाही वाढला हाेता. किमान तापमान २० ते २५ अंश सेल्सिअस तर कमाल तापमानाचा पारा ३० ते ३३ अंश सेल्सिअसवर हाेता.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात वातावरण ढगाळ हाेते; परंतु पावसाचे प्रमाण तुरळक हाेते. दरम्यान, जपासून सुरू हाेणाऱ्या श्रावणात श्रावणसरींची प्रतीक्षा आहे.

मान्सूनच्या सुरूवातीपासूनच यंदा जिल्ह्यावर पावसाची अवकृपा राहिली आहे. चाळीस टक्क्यावर असलेल्या पावसाच्या तुटीमध्ये पावसाचे खंड माेठे असल्याने दुष्काळाचे दुष्टचक्र ओढवण्याची भिती आहे. हवामान विभागाचे अंदाज यंदा चुकत असल्याचे चित्र आहे. दरम्यान सलग दुसऱ्या दिवशी तापमान वाढल्याचे चित्र आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar