पावसाने उघडीप दिल्यानंतर जळगावकरांना गुलाबी थंडीची चाहूल ; तापमान १२.६ अंशावर

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२१ । मागील काही दिवसापूर्वी बरसलेल्या परतीच्या पावसाने उघडीप दिल्यानंतर आता जळगावकरांना गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरातील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या चाेवीस तासांत जळगावचे तापमान १२.६ अंश नाेंदवले गेले. त्यामुळे थंडीची चाहूल लागू लागलीय. तापमानात चढ उतार सुरू असला तरी येत्या चार दिवसांत बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली,

हिवाळा सुरू झाला असला तरी राज्यातील बदलत्या वातावरणामुळे कधी थंडी तर कधी उकाडा असे अनुभव येत आहेत. मागील काही दिवसापूर्वी राज्यातील विविध भागांसह जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे थंडी गायब होऊन उकाडा जाणवू लागला होता. मात्र. गेल्या काही दिवसांपासून शहरातील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या चाेवीस तासांत जळगावचे तापमान १२.६ अंश नाेंदवले गेले. सकाळच्या सुमाराला काही भागांमध्ये धुकेही दाटत आहे.

रविवारी तापमानात घट हाेऊन थंडी वाढल्याचा अनुभव आला. हवामान विभागाच्या नाेंदीनुसार जळगावचे तापमान १२.६ अंश हाेते. वातावरणातील बदलाचा परिणाम येत्या काही दिवसात जाणवणार असून आजपासून राज्यातील बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस हाेऊ शकताे. १ डिसेंबरला जळगावात पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -