fbpx

मान्सून गायब ; जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा पारा वाढू लागला

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२१ । गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातला पाऊस थांबला आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात तापमानात वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. गेल्या दोन-तीन दिवसात जिल्ह्यातील तापमानातील पारा हळूहळू वाढत आहे. आज किमान तापमान २८ ते २९ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस आहे.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे पिकांना जीवनदान मिळाले होते. परंतु गेल्या २ ते ३ दिवसापासून पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तापमान वाढलं आहे. किमान आणि कमाल तापमानात सरासरी दोन ते चार अंशांनी वाढ झाली आहे. दिवसा प्रखर ऊन तर रात्रीही उकाडा जाणवू लागला आहे. त्यामुळे ऑक्टोबर हीट ऑगस्टमध्येच जाणवत असल्याचं चित्र आहे.

पावसाळ्याच्या दिवसांत ऑगस्ट महिन्यात सरासरी तापमान हे २५ ते ३० अंशांवर स्थिर असतं. पण आता मॉन्सूनची थांबल्याने तापमानात वाढ झाल्याचं दिसतंय. राज्यात सध्या सरासरी तापमान हे ३१ अंशांवर गेलं आहे.

उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता
राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी हिमालयात पश्चिमी विक्षोभ सुरू झाला आहे. त्यामुळे हिमालयात जोरदारा पावसाचा अंदाज आहे. आज २५ ऑगस्टपासून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातही वाऱ्यांची चक्रीय स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तुरळक सरी कोसळण्याचा अंदाज आहे. मात्र, १० सप्टेंबरपर्यंत राज्यात कुठेही जोरदारा पावसाचा अंदाज नाही. या कारणाने तापमान आणि उन्हाचा चटका आणखी वाढण्याची चिन्हं आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज