जिल्ह्यात तापमानात घट; गुलाबी थंडीची चाहूल 

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२१ । जिल्ह्यातील तापमानात घट होऊन ते संथगतीने आहे. तर गुलाबी थंडीची चाहूल वाढू लागली आहे. मंगळवारी शहराच्या किमान तापमानात एकाच दिवसात ५ अंशांची घट झाली असून, पारा २३ अंशावरून थेट १८ अंशावर आला आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

पावसाची टक्केवारी गेल्या तीन वर्षापासून वाढली असली तरी थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. सातत्याने निर्माण होत असलेल्या चक्रीवादळामुळे जिल्ह्यात थंडीचे प्रमाण कमी होत आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्याच आठवड्यात जिल्ह्यात थंडीचे आगमन झाले आहे. किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. त्यातच हिमाचल प्रदेश व काश्मीरमध्ये बर्फवृष्टीला सुरवात झाल्यामुळे उत्तरेकडून येणारे शीत वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे तापमानात घट झाली आहे. तसेच आगामी आठडाभरात तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात  आला आहे. येत्या काही दिवसात तापमानात अजून घट होण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज