fbpx

एरंडोल तालुक्यातील शेतकरी बांधवांना पीक पाहणी ॲप डाऊनलोड करण्याचे तहसिलदार यांचे आवाहन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२१ ।   एरंडोल तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना /खातेदारांना एरंडोल तहसिलदार सुचिता चव्हाण यांनी आवाहन केले आहे की महाराष्ट्र शासनातर्फे ई – पिकपाहणी हे मोबाईल अँपचे लोकार्पण केलेले आहे.आता शेतकरी बांधवांना त्यांच्या पिकांची नोंदणी मोबाईल वरुनच स्वत : चे शेतात असलेले पिकाची सातबान्यावर नोंदविता येणार असून सदर पिक पाहणी ही खालील प्रमाणे नोंदविता येणार आहे .मोबाईलवर ई – पिक पाहणी अँप डाऊनलोड करावा , अँपमध्ये आपली नोंदणी करावी , आपल्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओ.टी.पी. कायम स्वरुपी जतन करुन ठेवणे आवश्यक आहे , आपले खाते क्रमांक टाकून संपूर्ण माहिती भरावी , शेतातील पिकांचा फोटो अपलोड करुन संपूर्ण माहिती तपासून अपलोड करावी तसेच आपली ई – पिक पाहणी ही १५ ऑगष्ट , २०२१ ते १५ सप्टेंबर , २०२१ या कालावधीतच भरणे आवश्क आहे . सदर ई – पिक पाहणी सर्व शेतकरी बंधूंनी भरुन घ्यावी . मुदतीनंतर पिक पाहणी भरता येणार नाही याची नोंद घ्यावी . या बाबत काही अडचण असल्यास संबंधीत गावाचे तलाठी यांचंशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज