शिक्षकाचा कारमध्ये मृत्यू : फुटेज तपासणीसाठी २ पथके नियुक्त

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२२ । अमळनेर तालुक्यातील खोखरपाट येथील रहिवासी शुभम संजय पाटील (वय ३१) या उपशिक्षकाचा, गुरुवारी कारमध्ये जळून मृत्यू झाला होता. ही घटना घातपात आहे की आत्महत्या याचा तपास केला जात आहे. त्यामुळे घटनास्थळाच्या मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी पारोळा पोलिसांची दोन पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके फुटेज तपासत आहेत.

मृत शुभम पाटील घटनेपूर्वी कुठे थांबला होता, तो कोणत्या मार्गाने आला, याची खातरजमा करण्यासाठी विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. तसेच मृताने मोबाइलवर कोणाकोणाशी संभाषण केले, त्याचा सीडीआर पोलिसांनी मागवला आहे. मृतदेहाच्या त्वचेचा नमुना नाशिक येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. या घटनेमागील कारणे शोधण्यासाठी पोलिस सर्व अंगांनी तापस करत आहेत.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -