अखेर ‘ती’ वादग्रस्त निविदा रद्द

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२१ । तापी पाटबंधारे विकास महामंडळातर्फे ओझरखेडा ते माळेगाव हरताळा ता.मुक्ताईनगर येथील रस्त्याच्या कामाबाबत निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. निविदेतील काम मॅनेज असून चक्रधर कन्स्ट्रक्शनकडून दबाव आणला जात असल्याची तक्रार अखिल चौधरी यांनी केली होती. दरम्यान, ती निविदा रद्द करण्यात आल्याचे आदेश मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आले आहे.

वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजनेंतर्गत ओझरखेडा ते माळेगाव हरताळा शिवार ता.मुक्ताईनगर रस्त्याच्या कामासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. दरम्यान, निविदेत भाग न घेण्यासाठी आपल्यावर दबाव आणण्यात आला असून धमक्या देण्यात आल्या आहेत. निविदेतील काम चक्रधर कन्स्ट्रक्शनला देण्यासाठी सर्व मॅनेज करण्यात आल्याचा आरोप अखिल चौधरी यांनी केला होता. चौधरी यांनी मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले होते.

तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता य.म.कडलग यांनी दि.३ रोजी आदेश काढून अंदाजपत्रक अद्ययावतीकरणासाठी प्रसिद्ध केलेली निविदा रद्द केल्याचे पत्रात म्हटले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -