fbpx

तळवेळ येथील अपघातात तिघ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२१ । अज्ञात वाहनाच्या धडकेत तळवेळ येथील तिघे मित्रांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज मंगळवारी वरणगाव ते मुक्ताईनगर राष्ट्रीय महामार्गावरील फुलगावाच्या उड्डान पुलावर घडली आहे.

विवेक सुनिल पाटील (१६) श्याम राजेंद्र पाटील (१६), देवानंद सोपान पाटील (१७) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांचे नावे आहेत.

याबाबत असे की, भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील तिघे मित्र मोटर सायकल (क्र.एम.एच. १९ यु. ७८६३) ने भुसावळकडून घरी तळवेलकडे जात होते. यादरम्यान, राष्ट्रीय महामार्गाच्या फुलगाव जवळील नवीन उड्डान पुलावर अज्ञात वाहनाने मोटरसायकला जोरदार धडक दिली.

या धडकेत विवेक पाटील याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला तर श्याम पाटील आणि देवानंद पाटील या दोघांचा जखमी अवस्थेत उपचारासाठी जळगाव येथील गोदावारी रुग्णालयात उपचार घेऊन जात असताना त्यांचाही यात मृत्य झाला आहे.

दरम्यान, तिघ मित्र हे घरात एकुलते एक असल्याने तळवेल गावात शोककळा पसरली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज