फारूक शेख यांच्यावर तात्काळ कारवाई करा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२१ । महावितरणचे फारुक शेख यांनी मस्तवालपणे आतापर्यंत जिल्ह्यात कित्येक शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी फारुक शेख यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी सर्वपक्षीय आमदारांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या आढावा बैठकीत केली.

फारुक शेख यांनी केलेल्या कारवाईमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विद्युत पुरवठा खंडित केल्याने शेतकऱ्यांना शेती करणे अतिशय कठीण झाले आहे. यामुळे या मस्तवाल अधिकाऱ्याची तूर्तास हकालपट्टी करावी असा ठराव आमदार किशोर पाटील यांनी जिल्हा नियोजन समिती पुढे ठेवला. ज्याला सर्वपक्षीय आमदारांनी सहमती दिली.

नियोजन मंडळाचे अध्यक्ष पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, त्यांची हकालपट्टी किंवा निलंबन करण्याचा अधिकार आपल्याला नाही. कॅबिनेटमध्ये हा मुद्दा मी मांडणार आहे. ज्या-ज्या शेतकऱ्यांचे वीज मीटर कापले गेले आहे त्या सर्व शेतकऱ्यांकडून पन्नास टक्के वीज बिलाची रक्कम घेऊन त्यांना पुन्हा कनेक्शन देण्यात यावे, असेही ते म्हणाले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -