एसटी संप मागे घ्या, अन्यथा मी स्वत: बस चालविणार; आ. चंद्रकांत पाटील

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । येत्या दोन दिवसांत एस टी कर्मचाऱ्यांनी संप मागे न घेतल्यास मी स्वत: बस चालवत आपल्या मतदारसंघातील एस टी बस सेवा सुरू करणार असल्याचा इशारा शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील तालुक्यातील गारखेडा येथे खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपघात होऊन तिन जण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेबद्दल बोलतांना आमदार चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले.
एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने सर्वसामान्य जनतेला नाईलाजस्तव खाजगी प्रवासी वाहनांनी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

रिक्षातुन प्रवास करतांना अधिकचे प्रवाशी बसविल्याने गारखेडा येथील अपघात घडल्याची घटना घडली.या घटनेला संप करणारे एस टी कर्मचारी कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी यावेळेस केला.तसेच एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या कितीही महत्त्वाच्या असल्या तरी त्यांनी सर्वसामान्य जनतेचा विचार करुन त्वरीत बससेवा सुरू करावी असे आवाहन आमदार पाटील यांनी केले. एस टी महामंडळाची सेवा बंद असल्याने सामान्य नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.सध्या प्रवाशांना काहीच पर्याय नसल्याने ते मिळेल त्या वाहनाने प्रवास करीत आहे.त्यांचे हाल आम्हांला बघवत नासल्याचे पाटील म्हणाले.

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने ज्या सुविधा दिल्या आहेत त्या त्यांनी स्विकाराव्यात आणि ताबडतोब सेवा सुरू करावी अशी विनंती पाटील यांनी केली.अन्यथा मी स्वत: बस चालवणार आहे. माझे कार्यकर्ते देखील आपल्या मतदारसंघात बससेवा सुरू करतील असा इशारा आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -